माणगावमध्ये आढळला दुर्मिळ जातीचा चमकणारा सुरवंट

निसर्गात वेगवेगळ्या रंगाचे, आकाराचे, दुर्मिळ जातीची विविध जैवविविधता आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये काही दुर्मिळ जीवजंतूही असतात. त्यांचं दर्शन केव्हातरी आपल्याला होत असते. सुरवंट हा एक जीवजंतू आपल्याला झाडावरून टांगलेला पाहायला मिळतो. याच प्रजातीतील एक अनोखा, दुर्मिळ स्वयंप्रकाशी सुरवंट माणगाव मध्ये आढळला आहे.

माणगाव परिसरात आढळलेला हा सुरवट पाणथळ जागी आढळतो. रात्री अंधारात बाहेर पडणारा हा सुरवट काजव्याप्रमाणे स्वयंप्रकाशी असून त्याचे बाह्यांग हिरवे चमकदार आहे. त्याच्या शरीरावर गवताप्रमाणे टोकदार काटे आहेत. हा सुरवट झाडाच्या पानाला चिकटून बसून चिकट द्रव सोडतो जो पानाला घट्ट चिकटून राहतो. धोवयाची जाणीव होताच हा सुरवंट अंगावरील काटे ताणतो. रात्रीच्या प्रकाशात या सुरवंटाचे सौंदर्य आणखीनच उजळून येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या