कर्नाटकात दिसला दुर्मिळ मासा, वजन तब्बल 250 किलो!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकात अलीकडेच असाच एक दुर्मिळ मासा दिसला आहे. साधारण 10 फुटांहून अधिक लांबीच्या या सॉफिश माशाचे वजन तब्बल 250 किलो आहे. मालपे येथे हा मासा चुकून ‘सी कॅप्टन’ नावाच्या बोटीच्या जाळ्यात अडकल्याचे समजते. यासंदर्भात ट्विटरवर व्हिडीओ शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडीओमध्ये क्रेनवर हे मासे लटकलेले दिसत आहेत. दुर्मीळ मासे मंगळुरूतील एका व्यापाऱ्याला विकले गेले आहेत. तज्ञांच्या मते, कारपेंटर मासा ही एक प्रजाती आहे, ज्याची संख्या झपाटय़ाने घटली आहे. ही एक संरक्षक प्रजाती आहे. सॉफिशची कमाल लांबी 23 फूट किंवा त्याहून अधिक असू शकते. हा माशा 25 ते 30 वर्षे जगू शकतो. मासा शरीरात अंडी घालतो.