
आगामी लोकसभा निवडणुकीत 2024 साठी विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीने जोरदार तयारी केली आहे. जर राहुल गांधी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली तर भाजप नेत्या स्मृती इराणी यांची जमानत जप्त होईल, अशा शब्दांत काँग्रेस नेते राशीद अल्वी यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला.
काँग्रेस नेते राहुल गांधी हे उत्तर प्रदेशातील अमेठीतून आगामी लोकसभा निवडणूक लढवतील, अशी घोषणा उत्तर प्रदेश काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी शुक्रवारी केली. त्या पार्श्वभूमीवर राशीद अल्वी बोलत होते. राहुल गांधी यांच्या एण्ट्रीने स्मृती इराणी अमेठीतून पळ काढतील. परंतु माझी भाजपला विनंती आहे की, स्मृती इराणींना पळून जाऊ देऊ नका. राशीद अल्वी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही सडकून टीका केली. प्रियांका गांधींने वाराणसीमधून लोकसभा निवडणूक लढवली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा गुजरातला जातील. ते वाराणसीमधून निवडणूक लढवणार नाहीत, असे अल्वी म्हणाले.

























































