माचिसच्या काडय़ांपासून रथ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या देशात कलाकारांची कमी नाही. एकापेक्षा एक दर्जेदार कलाकार आणि त्यांच्या अद्भुत कलाकृती बघायला मिळतात. अशाच प्रकारे भुवनेश्वर येथील इश्वर राव यांनी अनोख्या कलेचे दर्शन घडवत माचिसच्या काडय़ांपासून रथाच्या लहान प्रतिकृती बनवल्या आहेत. ईश्वर राव यांनी भगवान जगन्नाथ, देवी सुभद्रा आणि भगवान बलभद्र यांचे तीन रथ साकारले आहेत. या मिनिएचर आर्टबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

तीन रथांचे लहान मॉडेल बनवण्यासाठी राव यांनी 435 काडय़ांचा वापर केला. प्रत्येक रथ साधारण साडेचार इंच उंचीचा आहे. रथांमध्ये एक इंचाच्या मूर्ती असून त्या लिंबाच्या लाकडापासून साकारल्या आहेत. प्रत्येक रथाला चार चाके आहेत. तीनही प्रतिकृती साकारण्यासाठी नऊ दिवसांचा कालावधी लागला, अशी माहिती राव यांनी दिली.