रत्नागिरी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 696, नवे 13 कोरोना रुग्ण

रत्नागिरी जिल्ह्यात 13 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 696 आहे. जिल्हा कोव्हीड रुग्णालय येथून 1 रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले त्यामुळे बरे झालेल्याची संख्या 461 झाली आहे.

13 पॉझिटिव्ह रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.त्यामध्ये चिपळूण येथील 3 रुग्ण उपकेंद्र कामथे, चिपळूण येथे,राजापूर येथील 1, रत्नागिरी येथील 2 आणि लांजा येथील 1 रुग्ण जिल्हा कोव्हीड रुग्णालयात, खेड येथील 5 रुग्ण कळंबणी उपकेंद्र येथे,दापोली येथील 1 रुग्‍ण दापोलीत आहेत.सध्या ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 209 आहे. त्यापैकी 04 रुग्णांवर रुग्णालयाच्या बाहेर उपचार चालू आहेत.

होम डिलिव्हरीला परवानगी
जिल्ह्यात आठ जुलै 2020 पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आलेले आहे तथापि घरात एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक तसेच नोकरीनिमित्ताने एकटे रहावे लागणारे अधिकारी व कर्मचारी यांच्या भोजनाची गैरसोय होऊ नये यासाठी लॉकडाऊन डाऊन आदेशामध्ये फेरबदल करून आदेशातील परिशिष्ट ब मध्ये काही बदल करण्यात येत आहे यानुसार हॉटेल मधून देण्यात येणारी पार्सल सुविधेसाठी मान्यता देण्यात आली आहे या सर्व व्यावसायिकांना covid-19 अंतर्गत सर्व नियमांचे पालन करून ही सुविधा घरपोच पद्धतीने देता येईल असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्री लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या