
अभिनेता वैभव मांगले यांच्या कसदार अभिनयाबरोबच त्यांच्यातील चित्रकारही महाराष्ट्राला पाहायला मिळाला आहे. वैभव मांगले यांच्या कुंचल्यातून कोकण चित्रात उमटू लागले आहे. त्यांच्याच देवरुखातील कनकाडी मेघी रस्ता आणि आजूबाजूचे शेत त्यांनी कागदावर हुबेहूब रेखाटलेय.
गतवर्षीच्या लॉकडाऊनपासून वैभव मांगले यांच्यातील चित्रकार कधी कागदावर तर कधी लाकडी फळीच्या तुकडय़ावर उतरू लागला. वैभव मांगले यांची अप्रतिम चित्रे त्यांच्या फेसबुक पेजवर पाहायला मिळतात. त्यांच्या या अप्रतिम कलाकृतीला अनेकांकडून दाद मिळाली आहे. या कलाकृतीतून वैभव मांगलेंच्या हातून सामाजिक कार्यही घडले ते म्हणजे त्यांनी चित्रांची विक्री करून बॅकस्टेज कलाकारांना मदत केली.
अलीकडेच त्यांच्या कुंचल्यातून कोकण विश्व पाहायला मिळत आहे. कोकणातील घर आणि पडवीचं चित्र पंडित रघुनंदन पणशीकर यांनी खरेदी केले आहे. वैभव मांगलेंच्या कुंचल्यातून देवरुख कनकाडीची मेघी छायाचित्राची अनुभूती देत आहे.
अंधारातील प्रकाश… हे चित्र माझे अतिशय आवडते. जयपूर घराण्याचे, गानसरस्वती किशोरी आमोणकरांचे पट्टशिष्य शास्त्राrय गायक पं. रघुनंदन पणशीकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अपर्णा पणशीकर यांना खूप आवडले. त्यांनी ते माझ्याकडून विकत घेतले. हा माझा सन्मान. – वैभव मांगले
























































