
रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार येथे उभ्या असलेल्या इंडिका कारने शुक्रवारी अचानक पेट घेतला. अग्निशमन दलाला तत्काळ पाचारण करून आग विझविण्यात आली.
रस्त्यावर उभ्या असलेल्या इंडिका कारमधून अचानक धूर बाहेर येताच आठवडा बाजारात खळबळ उडाली. गाडी हळूहळू पेट घेत असताना अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी पोहोचला. त्यानंतर आग विझविण्यात आली.

























































