रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणूक; 58,770 मतदार बजावणार आपला मतदान हक्क

714

रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून, शुक्रवार पासून आचारसंहिता सुरु झाली आहे. नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणूकीसाठी 29 डिसेंबर रोजी 49 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. या निवडणुकीत शहरातील 58,770 मतदार आपला हक्क बजावणार असून यात 28,746 पुरुष आणि 30,023 स्त्री मतदारांचा त्यामध्ये समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.विकास सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रमाविषयी माहिती दिली.

आपली प्रतिक्रिया द्या