
रत्नागिरी तालुक्यातील चांदोर गावात चार वर्षांपूर्वी अतिवृष्टीमध्ये दोन साकव पडले होते.दरवर्षी या दोन साकवांचे अंदाजपत्रक बनविण्याचा कार्यक्रम अधिकारी सालाबादप्रमाणे करतात आणि हि साकव दुरुस्ती कागदावर रहाते.यंदाच्या पावसाळ्यापूर्वी तरी साकव दुरूस्ती होईल का? अशी प्रतिक्षा ग्रामस्थांना पडली आहे.
चांदोर उगवतीवाडी येथे शासकीय जागेवर बीएसएनएलचा टॉवर उभारण्यात आला आहे.हा टॉवर नदीच्या काठावर आहे तसेच टॉवरला अपेक्षित उंची न दिल्याने पावसाळ्यात पाणी भरले की टॉवरमध्ये बिघाड होतो आणि गावातील मोबाईल यंत्रणा ठप्प होते.त्यामुळे टॉवरच्या बाजूला संरक्षक भिंत उभारणे आवश्यक आहे.यापूर्वी अधिकाऱ्यांनी संरक्षक भिंतीचे अंदाजपत्रक तयार केले होते मात्र पुडे कोणतीही कारवाई झालेली नाही.



























































