रत्नागिरी – बंद शाळांना दामदुप्पट बिले

248

लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद असताना महावितरणने दामदुप्पट वीजबिले काढली आहेत. ही वीजबिले कशाच्या आधारावर काढली आहेत याचा महावितरणने खुलासा करावा, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी महावितरण रत्नागिरीच्या कार्यकारी अभियंताकडे निवेदनाद्वारे केली आहे.

एप्रिल-मे महिन्यात विजेचा वापर खूप असतो तसेच लॉकडाऊनमुळे सर्वच लोक घरी होते, म्हणून विजेचा वापर वाढला असे कारण देऊन महावितरणने दामदुप्पट दराने घरगुती वीज बिले काढली. मग लॉकडाऊनमध्ये ज्या शाळा बंद होत्या अशा शाळांची वीजबिले जास्त दराने का आकारली, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या