मरकजवरून रत्नागिरीत आलेली व्यक्ती कोरोनाबाधित

643

रत्नागिरीत कोरोनाबाधित रूग्ण सापडला असून तो दिल्ली येथील मरकज मधून आल्याचे निष्पन्न झाले आहे.59 वर्षीय ही व्यक्ती दिल्लीतून मुंबईत आली. मुंबईतून कोच्चुवली एक्सप्रेसने रत्नागिरीत उतरली. रत्नागिरीतील राजिवडा येथे राहिली होती. त्यामुळे राजिवडा पासूनचा तीन किमी परिसर सील करण्यात येणार आहे अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सामंत म्हणाले की, जे लोक मुंबई, पुणे आणि इतर राज्यातून आले आहेत त्यांनी स्वतःहून पुढे यावे असे शासनाने कळवले होते. त्यानंतरही अनेक जण पुढे येत नाहीत. असे जर कोण सापडले आणि त्यांच्याकडून कोरोनाचा प्रादुर्भाव झाला तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करू. तसेच अशा लोकांना आश्रय देणाऱ्या लोकांवरही आम्ही गुन्हे दाखल करू असा इशारा देताना राजिवडा पासून तीन किमी परिसर सील करण्यात येणार असून वेळ पडल्यास एसआरपीला बोलाविण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

परिसरातील मृत व्यक्तींचा शोध घेणार- जिल्हाधिकारी
सापडलेली कोरोनाबाधित व्यक्ती येथील निवासी नसून ती जमातीसाठी आली होती. राजिवडा परिसर हा दाटीवाटीचा आहे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन करताना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा म्हणाले की आम्ही त्यापरिसरातील निर्जंतुकीकरण करणार आहोत. तसेच त्या परिसरात गेल्या दहा दिवसात मृत्यू झाले आहेत त्यांचा मृत्यू नक्की कशाने झाला याचा तपास करणार आहोत. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी सांगितले की. मरकजला गेलेले तीन जण सापडले असून त्यापैकी दोघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. अन्य जमातीही गेल्या काही दिवसात रत्नागिरीत आल्या आहेत. काही लोकांचा शोध आम्ही घेत आहोत एका जमातीत 10-15 लोकांचा समावेश असतो. जर कोणी बाहेरून आला असेल तर तात्काळ जाहिर करा असे मुंडे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी के.एच.बघाटे उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या