रत्नागिरी – एका प्रशासकीय अधिकाऱ्याला कोरोना, जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 683 वर

373
corona-virus-new-lates

जुलै महिना सुरू होताच रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढले आहे. रत्नागिरीतील आणखी एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे.गेले दोन दिवस त्यांना सर्दी आणि ताप येत होता. स्वॅब तपासणी केल्यानंतर त्यांच्या अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.जिल्ह्यात आणखी 22 कोरोनाबाधित रूग्ण सापडले आहेत.

बावीस पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 11 रुग्ण कामथे येथील 7 रुग्ण रत्नागिरीतील, 3 रुग्ण कळंबणी आणि 2 रुग्ण लांजा येथील आहेत. आता जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 683 इतकी झाली आहे. आतापर्यंत 449 रूग्ण बरे झाले असून 26 जणांचा मृत्यू झाला आहे. रत्नागिरीत कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू असून आज लॉकडाऊनचा तिसरा दिवस आहे

आपली प्रतिक्रिया द्या