रत्नागिरीत आणखी 8 कोरोनाबाधित आढळले

620
corona-new

रत्नागिरीत कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात आणखी आठ कोरोनाबाधितांची भर पडली आहे. रत्नागिरी तालुक्यात सहा आणि संगमेश्वर तालुक्यात दोन रूग्ण सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 183 इतकी झाली आहे.

त्यापैकी 67 जण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत.आता पर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून 111 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.मुंबईहून आलेल्या चाकरमान्यांचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह येत असल्याने रत्नागिरीत कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.गेल्या वीस दिवसात सुमारे पावणे दोनशे कोरोनाबाधित रूग्ण सापडले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या