
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील 20 कनिष्ठ प्राथमिक शाळा आणि 14 वरिष्ठ प्राथमिक शाळांना आदर्श शाळा पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती जिल्हा परिषद शिक्षण सभापती सुनिल मोरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली़.
आदर्श शाळा पुरस्कारांबरोबरच आदर्श केंद्रप्रमुख पुरस्कारही जाहीर करण्यात आले. हे पुरस्कार दापोलीचे वणौशी गुरववाडी येथील प्रवीण काटकर आणि साखरपा येथील मोहन कनवजे यांना जाहीर झाला आहे़. केंद्रप्रमुख निवडताना गुणवत्ताधारक विद्यार्थी 100 टक्के प्रगत शाळा, डिजीटल शाळा, शैक्षणिक उठाव, गोपनीय अहवाल, पटसंख्या वाढ, शैक्षणिक पात्रता वाढवण्यासाठी प्रयत्न, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना या निकषांचा विचार करण्यात आला असल्याची माहिती शिक्षण सभापती सुनिल मोरे यांनी दिली़. या पुरस्कार वितरणाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे़.
आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त शाळा पुढीलप्रमाणे आहेत़. मंडणगड तालुक्यातील कनिष्ठ प्राथमिक शाळा जि़.प़.प्राथमिक शाळा पिंपळोली मराठी, वरिष्ठ प्राथमिक शाळा जि़.प.क़ेंद्र शाळा कुंबळे, जि़.प़. शाळा नुतन विद्यामंदिर पालघऱ. दापोली तालुक्यातील कनिष्ठ प्राथमिक शाळा जि़.प़.प्राथमिक शाळा आंबवली खुर्द, जि़.प़.प्राथमिक शाळा आसूद नं.2, वरिष्ठ प्राथमिक शाळा जि़.प.क़ेंद्र शाळा आसूद नं.1. खेड तालुक्यातील कनिष्ठ प्राथमिक शाळा जि़.प़.प्राथमिक मराठी शाळा गुणदे तांबड, जि़.प़.प्राथमिक शाळा भडगाव उसरेवाडी, वरिष्ठ प्राथमिक शाळा जि़.प़.पूर्ण प्राथमिक शाळा असगणी नं.2, जि़.प़.पूर्ण प्राथमिक शाळा कर्टेल, जि.प़.पूर्ण प्राथमिक शाळा अस्तान नं.1. चिपळूण तालुक्यातील कनिष्ठ प्राथमिक शाळा जि़.प.क़ेंद्र शाळा मार्गताम्हाणे नं.1, जि़.प़.प्राथमिक शाळा खांदाट भोई, वरिष्ठ प्राथमिक शाळा जि़.प़.पूर्ण प्राथमिक गोंधळे नं.1. गुहागर तालुक्यातील कनिष्ठ प्राथमिक शाळा जि़.प़.प्राथमिक शाळा वडद नं.2 अटकवाडी, जि़.प़.प्राथमिक शाळा पोमेंडी रांगणेवाडी, जि़.प़.प्राथमिक शाळा कुटगिरी नं.3 डिंगणकरवाडी, जि़.प़.प्राथमिक शाळा विणे नं.2, वरिष्ठ प्राथमिक शाळा जि़.प़.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा साखरी बुद्रुक, जि़.प़.पूर्ण प्राथमिक शाळा पालपेणे नं.1 कुंभारवाडी़. संगमेश्वर तालुक्यातील कनिष्ठ प्राथमिक शाळा जि़.प़.प्राथमिक शाळा संगमेश्वर नं.3, जि़.प़.प्राथमिक शाळा लोवले नं.1, वरिष्ठ प्राथमिक शाळा जि़.प़.पूर्ण प्राथमिक शाळा कोंडगाव बु.क़ेंद्र शाळा साखरपा नं.1, जि़.प़.पूर्ण प्राथमिक शाळा कासे नं.1. ऱत्नागिरी तालुक्यातील कनिष्ठ प्राथमिक शाळा जि़.प़.प्राथमिक शाळा कोतवडे वारेवाडी ढोकमळे, जि़.प़.प्राथमिक शाळा खालगाव नं. 2, जि़.प़.प्राथमिक शाळा चांदेराई नं.1, जि़.प़.प्राथमिक शाळा बसणी, वरिष्ठ प्राथमिक शाळा जि़.प़.पूर्ण प्राथमिक आगवे तर्फे फुणगुस़ लांजा तालुक्यातील कनिष्ठ प्राथमिक शाळा जि़.प़.प्राथमिक शाळा हर्चे नं.3, जि़.प़.प्राथमिक शाळा पडवण नं.1, वरिष्ठ प्राथमिक शाळा जि़.प़.पूर्ण प्राथमिक शाळा आंजणारी मराठी़. राजापूर तालुक्यातील कनिष्ठ प्राथमिक शाळा जि़.प़.प्राथमिक शाळा कोदवली नं.3, वरिष्ठ प्राथमिक शाळा जि़.प़.पूर्ण प्राथमिक शाळा पेंडखळे नं.2 या शाळांचा समावेश आहे़.




























































