रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक; मॅरेथॉन छाननीनंतर आठ अर्ज अवैध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी मंगळवारी पूर्ण झाली. या छाननीमध्ये 8 अर्ज अवैध ठरले. आता निवडणूक रिंगणात 30 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यापैकी सहाजण यापूर्वीच बिनविरोध झाले आहेत.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवारी छाननी होती. ही छाननी रात्री उशीरापर्यंत सुरु होती. या छाननीनंतर प्राथमिक कृषी पतपुरवठा व विकास कार्यकारी सहकारी संस्था तसेच धान्य अधिकोष सहकारी संस्थामधून उमेदवारी अर्ज भरलेले रविकांत घोंगडे यांचे दोन अर्ज, प्राथमिक पतपुरवठा विकास कार्यकारी सेवा संस्था तसेच धान्य अधिकोष सहकारी संस्थामधून अर्ज भरलेले संजय आयरे, प्राथमिक पतपुरवठा विकास कार्यकारी सेवा संस्था तसेच धान्य अधिकोष सहकारी संस्थामधून अर्ज भरलेले सुरेश साळुंखे, प्राथमिक पतपुरवठा विकास कार्यकारी सेवा संस्था तसेच धान्य अधिकोष सहकारी संस्थामधून अर्ज भरलेले सचिन गिजबिले, रघुनाथ कोस्टुरे यांचे अर्ज अवैध ठरले आहेत. तर तानाजीराव चोरगे, महादेव सप्रे, बाबाजी जाधव, गजानन पाटील, आदेश आंबोळकर, रमेश दळवी, राजेंद्र सुर्वे, सुधीर कालेकर, अनिल जोशी, चंद्रकांत बाईत, प्रल्हाद शेट्ये, महेश खामकर या उमेदवाराचे अर्ज वैध ठरले आहेत.