
ढगांचा गडगडाट करत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने आज रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढले. पावसामुळे रस्ते जलमय झाल्याने वाहतूकीला अडथळा निर्माण झाला. अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले.
आज दिवसभर ढगाळ वातावरण होते.सकाळ पाऊस धो-धो कोसळू लागला.गेले तीन दिवस कोकणात पाऊस सुरू होता.आज सकाळपासून पावसाने कहर केला.अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेल्या भातपीकाचे मोठे नुकसान झाले आहे.भातशेतीच्या नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 2572 मिमी पाऊस पडला आहे.




























































