रत्नागिरीत ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ढगांच्या गडगडाटासह रत्नागिरी शहरात आज सायंकाळी पावसाने हजेरी लावली. उकाड्याने हैराण झालेल्या रत्नागिरीकरांना पावसाने दिलासा दिला आहे. सायंकाळी अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची त्रेधातिरपीट उडाली.

रत्नागिरी शहर परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. अनेकांनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला. सायंकाळी अचानक आलेल्या पावसामुळे मातीचा सुगंध सर्वत्र दरवळला. रेनकोट,छत्र्या नसल्यामुळे अनेकांना पावसात भिजावे लागले. काही दुकानाच्या आडोशाला उभं राहून पाऊस थांबण्याची प्रतिक्षा केली.मात्र रात्री नऊ वाजेपर्यंत पाऊस पडत होता.

शीळ धरणात ठणठणाट!

रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणातील पाणी साठा आता संपुष्टात आला आहे. त्यामुळे पुरेसा पाऊस न पडल्यास रत्नागिरीकरांवर पाणी टंचाईचे मोठे संकट आहे. त्यामुळे रत्नागिरीकर मान्सूनची प्रतिक्षा करत आहेत.