
सामना प्रतिनिधी। रत्नागिरी
गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या महिलेचे बसप्रवासात चोरट्यांनी दागिने लंपास केल्याची घटना घ़डली आहे. निलीमा मिथुन राजेकर (33)असे त्यांचे नाव आहे. त्या लांजाहून बसने रत्नागिरीला निघाल्या होत्या. तेव्हाच चोरट्यांनी डाव साधला व त्यांच्या पर्समधून 4 लाख 93 हजार 750 रुपयांचे दागिने लुबाडल्याची घटना घडली आहे़.
निलीमा ड़ोंबिवलीच्या असून गणेशोत्सवासाठी गावी आल्या होत्या़. त्यानंतर त्या मुंबईला परत निघण्याकरीता लांजा एसटी स्टॅण्ड येथून रत्नागिरी येथे येण्यासाठी बसमध्ये बसल्या़. प्रवासादरम्यान वेरळजवळ येताच निलीमा यांनी पर्समधले दागिने तपासले़ तेव्हा त्यांना दागिने पर्समध्ये नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी लांजा पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली़.






























































