बिबट्याने महिलेसह वनविभागाच्या अधिकाऱ्यावर केला हल्ला

477
leopard

रत्नागिरी तालुक्यात निवळी शेल्टीवाडी येथे बागेतील काजू काढण्यासाठी गेलेल्या महिलेवर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर झाडावर लपून बसलेल्या बिबट्याला पकडणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांवरही बिबट्याने हल्ला केला.त्यानंतर बिबट्याला पकडण्यात यश आले आहे.

लक्ष्मी विष्णू गावडे बागेत काजू काढण्यासाठी गेलेल्या असताना अचानक बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने हल्ला करताच त्यामहिलेने आरडाओरडा केला. ही घटना कळताच यशवंत नितोरे ,विशाल गावडे, चेतन गावडे, शैलेश खापरे यांनी तात्काळ पोलिस पाटील यांना कळवले. वनविभागाचे पथक त्याठिकाणी दाखल झाले.वनविभागाच्या अधिकाऱी प्रियंका लगड यांच्यावरही बिबट्याने हल्ला केला. त्यांच्या पायाला दुखापत झाली. त्यानंतरही वनविभागाने बिबट्याला जेरबंद केले.

आपली प्रतिक्रिया द्या