होर्डिंगचे तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करा; रत्नागिरील 192 होर्डिंग मालकांना नगरपरिषदेची नोटीस

घाटकोपर सोमवारी 13 मे ला होर्डिंग कोसळून अनेक जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर रत्नागिरी शहरातील होर्डिंग अडचणीत आले आहेत. रत्नागिरी नगर परिषदेने गंभीर पावले उचलली असून शहरातील 192 होर्डिंगच्या मालकांना होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल तात्काळ सादर करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

मुंबईत झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे घाटकोपर येथील एक महाकाय होर्डिंग कोसळून 17 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर रत्नागिरी शहरातील होर्डिंगचा प्रश्न अडचणीत आला आहे. रत्नागिरी नगरपरिषदेकडे सध्या शहरात 192 अधिकृत होर्डिंग असल्याची नोंद आहे. या सर्व होर्डिंग मालकांना नगरपरिषदेने नोटीस पाठवली आहे. या सर्व होर्डिंगचे तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात होर्डिंग लावण्यात आली आहेत. एकावर एक अशी दुमजली होर्डिंग उभारण्यात आल्यामुळे शहराचे सौंदर्य बिघडले आहे. शहर बकाल होत आहे. त्याचबरोबर शहरात अनेकठिकाणी अनधिकृत होर्डिंग आहेत. अशा होर्डिंगचा शोध घेऊन नगरपरिषद तो होर्डिंग काढून टाकणार आहे.