
ज्या शाळेत इयत्ता पाचवी ते सातवीचे शिक्षण घेत अभ्यासाचे धडे गिरवले त्याच शाळेची मुख्याध्यापिका होण्याचा बहुमान अंजली पिलणकर यांना मिळाला आहे. मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूल रत्नागिरीच्या मुख्याध्यापक पदाचा पदभार अंजली पिलणकर यांनी स्वीकारला आहे.
अंजली पिलणकर या मूळच्या रत्नागिरीच्या आहेत. गेली 27 वर्ष त्या मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूलमध्ये ज्ञानदानाचे काम करत आहेत. विद्यार्थ्यांसाठी नेहमी कठीण वाटणारा इंग्रजी विषय त्या शिकवतात. त्यांना 2014-15 या वर्षीचा आदर्श महाराष्ट्र छात्र सेना शिक्षक पुरस्कार, 2022 मध्ये भारत स्काऊड मुंबईचा राज्य उत्कृष्ट गाईडर पुरस्कार पुरस्कार, लायन्स क्लब रत्नागिरीचा आदर्श शिक्षक पुरस्कार आणि रोटरी क्लब रत्नागिरीचा नेशन बिल्डर पुरस्कार मिळाला आहे. अंजली पिलणकर ह्या कवयित्री आहेत. अनेक काव्यसंमेलनात त्यांनी सहभाग घेतला आहे.
अंजली पिलणकर यांनी पाचवी ते सातवीपर्यंतचे शिक्षण मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूलमध्ये घेतले. शिक्षक म्हणूनही त्यांची निवड अ. के. देसाई हायस्कूलमध्ये झाली. 27 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवानंतर त्यांना मुख्याध्यापक होण्याची संधी मिळाली आहे. ज्या शाळेत शिक्षण घेतले त्याच शाळेची मुख्याध्यापिका होण्याचा दुर्मिळ योग अंजली पिलणकर यांच्या आयुष्यात आला आहे. मुख्याध्यापक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर
पदग्रहण व स्वागत समारंभ कार्यक्रमात छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे येथील वरिष्ठ प्रकल्प संचालक, सुशील शिवलकर, प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका प्रज्ञा दळवी, मराठा मंदिर,स. रा. देसाई अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रांत रावराणे, प्राचार्य के.टी.करे, रत्नागिरी जिल्हा टी. डी. एफ. चे अध्यक्ष सागर पाटील, सी.एस.पाटील, सुचिता पिलणकर उपस्थित होत्या.