
मच्छीमारांना पूर्वी ९५ रुपये लीटर दराने मिळणारे डिझेल आखाती देशातील युध्दानंतर १४५ रूपये लीटर प्रमाणे मिळत असल्याने मच्छिमार आर्थिक संकटात सापडला आहे. मच्छिमारांना डिझेल पूर्वीप्रमाणे ९५ रूपये दराने मिळावे अशी मागणी रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छिमारांकडून केली जात आहे.
रत्नागिरीतील मच्छिमार दिलावर गोदड यांनी सांगितले की, आज पेट्रोल पंपावर डिझेल ९५ रुपये दराने मिळते आणि मच्छीमारांना तेच डिझेल १४५ रूपयांनी विकले जाते. इतके महागडे डिझेल खरेदी करणे मच्छिमारांना परवडत नाही. डिझेल दरवाढीमुळे मच्छिमार संस्थांनी डिझेल खरेदी बंद केली आहे.
दुसरीकडे पेट्रोल पंपावर मच्छिमारांना डिझेल दिले जात नाही, अशामुळे मच्छिमार अडचणीत सापडले आहेत. सरकारची सबसिडी येण्यास तीन-चार महिने जातात त्यापेक्षा मच्छीमारांना पूर्वीप्रमाणे ९५ रूपये दराने डिझेल द्यावे अशी मागणी गोदड यांनी केली आहे.
बंदीच्या काळात अवैध मासेमारी
सरकार मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्ट पर्यंत वाढविण्याचा विचार करत आहे, परंतू त्याचा फायदा काहीच होणार नाही कारण बंदीच्या काळातही मासेमारी सुरू आहे.बंदीच्या काळात होणाऱ्या मासेमारीवर करा अशी मागणी मच्छिमारांकडून होत आहे.






























































