Ratnagiri News – पर्यटनासाठी आलेल्या मायलेकाने उचललं टोकाचं पाऊल, देवगड तालुक्यात खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवगड तालुक्यातील समुद्रकिनारी एका होम स्टे मध्ये पर्यटनासाठी वास्तव्यास आलेल्या गोवा येथील मायलेकाने नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. सदरची घटना शुक्रवारी 13 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 8.30 ते 14 फेब्रुवारी 2020 दुपारी 12:30 च्या कालावधीत घडली असून होमस्टेच्या मालकांनी देवगड पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवा येथील पर्यटक देवगड तालुक्यातील समुद्रकिनारी पर्यटनासाठी शुक्रवारी 13 फेब्रुवारी रोजी रात्री 8.30 वाजता वास्तव्यासाठी आले होते. दुसऱ्या दिवशी देवदर्शन करून 14 फेब्रुवारी रोजी 8.30 वाजताच्या सुमारास पुढील प्रवासासाठी निघणार होते. दरम्यान होमस्टेचा चेक आउट टाइमिंग होऊन देखील पर्यटक बाहेर येत नसल्यामुळे होमस्टेच्या मालकांच्या पत्नीने खिडकीवरील पडदा बाजूला करून आत डोकावून पाहिले असता आई व मुलाने नायलॉनच्या दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्येच्या केल्याच्या स्थितीत आढळून आले. सदर मयत महिला शारदा कृष्णा गावडे (64) आणि मुलगा सुदेश कृष्णा गावडे (35) रा. गोवा असे असून देवगड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नातेवाईक व मित्र परिवाराशी संपर्क साधला आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसेच पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव पोलीस हवालदार महेंद्र महाडिक अधिक तपास करीत आहेत.