
कोकण रेल्वेमार्गावर ओखा एक्स्प्रेसने प्रवास करणारा गुजरात येथील प्रवासी संगमेश्वरजवळ रेल्वेतून पडला. त्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी 8.45 वा.सुमारास घडली.
गुजरातमधील मनदोरा रमेश देवजी ( 48, रा. जामनगर, गुजरात) असे मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. मनदोरा देवजी हे ओखा एक्स्प्रेसने गुजरात ते गोवा असा प्रवास करत होते. संगमेश्वर स्थानकाजवळ ते रेल्वेतून पडले. त्यांना तातडीने रेल्वे पोलिसांनी रत्नागिरीत आणून उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना शुक्रवारी पहाटे 3.45 वा.सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.






























































