
उत्पादन शुल्क विभाग चिपळूणने वालोपे येथे धाड टाकून 5 लाख 67 हजार 840 रूपये किमंतीची 556 लीटर गोवा बनावटीची दारू पकडली आहे.घराच्या पडवीत गोवा बनावटीच्या दारूची गोदामचं उभी रहात असल्याची माहिती पुढे येत आहे.याकारवाईत एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
वालोपे येथे गोवा बनावटीच्या दारूचा साठा असल्याची गुप्त माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती.त्यांनी वालोपे तांबीटकरवाडी येथे धाड टाकून एकाघराच्या मागील पडवीत साठा करून ठेवलेली गोवा बनावटीची दारू पकडली.एकूण 63 बॉक्स सापडले. त्यामध्ये 556.92 लीटर दारू होती. त्याची किंमत 5 लाख 67 हजार 840 रूपये आहे.उत्पादन शुल्क विभागाने हा दारू साठा प्रवीण गणपत तांबीटकर याच्या ताब्यातून जप्त केला आहे.त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 (ई), 90 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.हि कारवाई राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक किर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूणचे निरीक्षक सुनील आडेरकर, शुभम काडापुरे, निखिल लोंढे, मयुर पुरीबुवा,विशाल विचारे यांनी केली आहे.
अवैद्य दारू विक्रीची तक्रार व्हॉट्सॲपवर करा
जिल्ह्यात कुठेही हातभट्टी,परराज्यातील अवैध दारू,बनावट माडीची विक्री होत असेल तर मो.नं. 8422001133 या व्हॉटसॲप क्रमांकावर किंवा 18002339999 या टोल फ्री क्रमांकावर करा असे आवाहन उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.