Ratnagiri News – बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री देव भैरीचा शिमगोत्सव २ मार्चपासून सुरु

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी शहरातील बारा वाड्यांचे ग्रामदैवत असलेल्या श्री देव भैरीबुवाचा शिमगा उत्सव २ मार्चपासून सुरु होणार आहे. २ मार्चला मध्यरात्री १२ वाजता श्री देव भैरीची पालखी श्रीदेवी जोगेश्वरीच्या भेटीला निघेल आणि शिमगोत्सवाला प्रारंभ होईल.

२ मार्चला रात्री १० वा. सहाणेवरुन श्रीदेव भैरीला उत्सवाचे निमंत्रण देण्यासाठी गावकरी, मानकरी, विश्वस्त,गुरव मंडळी व ग्रामस्थ मंडळी जातील. मध्यरात्री १२ वाजता श्रीदेव भैरीची पालखी श्रीदेवी जोगेश्वरी भेटीसाठी निघेल. खालची आळी, कै. बाळोबा सावंत यांच्या आगरातून महालक्ष्मी शेतातून मध्यरात्रीनंतर दीड वाजेपर्यत श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरात जाईल.

श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरात मुरुगवाडीतील मंडळी आल्यानंतर पहाटे ३ वाजता श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरातून पालखी ग्रामप्रदक्षिणा व होळीचा शेंडा उभा करण्यासाठी बाहेर पडून झाडगांव सहाणेवरुन झाडगांव नाका, टिळक आळी, कॉग्रेस भूवन, मुर्लीधर मंदीर, बंदर रोड मार्गे पहाटे ५ वाजता मांडवी भडंग नाका येथे जाईल. तेथून पुढे प्रत्येकी एक-एक तास याप्रमाणे मांडवी, घुडेवठार, विलणकरवाडी, चंवडे वठार, खडपे वठार मागील समुद्र मार्गाने जावून पुढे शेटये यांचे घराजवळ रस्त्यावर येवून खडपेवठारातून गोडीबाव तळ्यावर सकाळी १० वाजता येईल. तेथून तेली आळी भागातून, राम नाका, राम मंदिर येथे सकाळी ११.३० वाजता येईल.

तिथून पुढे बारा वाडयांच्या वतीने राधाकृष्ण नाका, गोखले नाका येथे दुपारी १२ वाजता येईल तेथून पुढे गोखले नाक्यावरुन गाडी तळावरुन सहाणेजवळून, मुरुगवाडयातील शाळेच्या मागे श्री शिवलकर यांच्या कंपाऊंडमध्ये होळीचा शेंडा घेण्यासाठी जाईल. तेथून होळीचा शेंडा घेऊन दुपारी ३ वाजेपर्यत झाडगाव येथे सहाणेवर जावून तेथे होळी उभी केली जाईल.रात्रौ ९ वाजता धुळवड साजरी करण्यासाठी श्रीदेव भैरीची निशाण सहाणेवरुन निघेल