
रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी पोलीस शिपायांच्या 100 जागेकरिता तब्बल 4 हजार 111 उमेदवारी अर्ज आले आहेत.त्यामध्ये 1027 महिला आणि 3024 पुरुष उमेदवार आहेत. पोलीस चालक शिपाई पदाच्या 8 जागेकरिता 2 हजार 368 अर्ज आले आहेत.त्यामध्ये 134 महिला आणि 2234 पुरुष उमेदवार आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली.
पोलीस भरती करतो असे सांगून कोण पैसे मागत असेल तर त्यांनी तात्काळ रत्नसेतू मो.931271415612 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या फोन – 02352- 222893 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


























































