रत्नागिरीत पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू, पहिल्याच दिवशी 34 हजार विद्यार्थ्यांची हजेरी

कोरोनाच्या प्रादुर्भावाने गेले दहा महिने बंद असलेल्या शाळेतील पाचवी ते आठवीचे वर्ग आजपासून सुरू झाले.रत्नागिरी जिल्ह्यातील 1611 शाळा सुरू झाल्या असून पहिल्या दिवशी 34 हजार 264 विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली.

जिल्ह्यात पाचवी ते आठवीच्या 2172 शाळा असून शाळेत 72 हजार 401 विद्यार्थी आहेत. सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करत आजपासून शाळा सुरू झाल्या. 2172 पैकी आज 1611 शाळेत घंटा वाजली.पहिल्या दिवशी 72 हजार 401 पैकी 34 हजार 264 विद्यार्थी उपस्थित होते.त्यामध्ये मंडणगड तालुक्यात 26 शाळांतील 783 विद्यार्थी,दापोली तालुक्यातील 47 शाळेतील 1927 विद्यार्थी,खेड तालुक्यातील 338 शाळेतील 1720 विद्यार्थी,गुहागर तालुक्यातील 150 शाळेतील 3549 विद्यार्थी,चिपळूण तालुक्यातील 150 शाळेतील 7114 विद्यार्थी,संगमेश्वर तालुक्यातील 242 शाळेतील 4794 विद्यार्थी,रत्नागिरी तालुक्यातील 212 शाळेतील 7615 विद्यार्थी,लांजा तालुक्यातील 174 शाळातील 2312 विद्यार्थी,राजापूर तालुक्यातील 188 शाळेतील 4405 विद्यार्थी उपस्थित होते.

21 शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह

शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यात आली असून एकूण 21 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामध्ये खेड येथे 2,संगमेश्वरला 12,रत्नागिरी 2,लांजा 1 आणि राजापूरात 4 कोरोना पॉझिटव्ह रूग्णांचा समावेश आहे.आज शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्याचे थर्मल स्क्रिनिंगने तपासणी करण्यात आली.सोशल डिस्टन्सिंग पाळून मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या