
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एकूण 12 उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. गुरुवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 7 उमेदवारांनी अर्ज भरले.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे डॉ. निलेश राणे यांनी अर्ज भरले आहेत. काँग्रेस आघाडीच्यावतीने नविनचंद्र बांदिवडेकर, वंचित बहुजन आघाडीतर्फे मारुती जोशी, अखिल भारत हिंदू महासभेचे अजिंक्य गावडे, बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टीतर्फे राजेश दिलीप जाधव, बहुजन समाज पार्टीतर्फे किशोर वरक, समाजवादी फ़ॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे उमेदवार संजय गांगनाईक, अपक्ष विनायक लवू राहत, पंढरीनाथ आंबेरकर, बहुजन मुक्ता पार्टीचे भीकूराम पालकर, अपक्ष नारायण गवस यांनी अर्ज दाखल केले आहेत. शुक्रवारी 5 एप्रिल रोज़ी छाननी होणार आहे. 8 एप्रिलला दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.






























































