
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
बेवारस मृतदेह जेव्हा सापडतो तेव्हा शवविच्छेदनानंतर त्या मृतदेहाच्या पार्थिवावर शेवटच कफनही टाकायला कुणी नसतो अशावेळी मृत्यू पावलेला माणूस हिंदू आहे की मुस्लीम हे न पाहता एक अवलिया जिल्हा रुग्णालयात कफन स्वत:च्या पैशातून दान म्हणून देतो. त्या अवलियाचं नाव आहे सुहेल मुकादम. जीवंत रुग्णांना फळवाटप, अन्नदान, वस्त्रदान अनेकजण करतात. पण गेली दहा-बारा वर्ष कफनदान करणारा सुहेल मुकादम आगळावेगळा दाता आहे.
मुस्लीम मोहल्यात रहाणारा सुहेल त्याच्या राजिवडा परिसरातील रुग्णांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात घेऊन येऊ लागला तेव्हा त्याच्या गरीब रुग्णांना कुणी वाली नसतो,ओळखी शिवाय झटपट उपचार होत नाहीत. तेव्हापासून सुहेल रुग्णाच्या मदतीसाठी धावू लागला. सुहेल मुकादम रुग्णालयात मदत करतो हे माहीत झाल्यामुळे अनेक जण जिल्हा रुग्णालयात जातात सुहेल मुकादमला फोन करतात सहेल मुकादमही जात-धर्म न पहाता मदतीसाठी येतो. मदतकार्य करत असताना बेवारस येणाऱ्या मृतदेहासाठी शवविच्छेदनानंतर त्या मृतदेहाला कफनही मिळत नाही हे चित्र पाहिल्यानंतर सुहेल मुकादमने बेवारस मृतदेहांसाठी कफनदान करायला सुरुवात केली. एखादा बेवारस मृतदेह आल्यानंतर कफनसाठी सुहेल मुकादमला फोन केला जातो मग सुहेल मुकादम कफन घेऊन रुग्णालयात हजर रहातो. अशा घटनांच्यावेळी सारखे फोन करण्याची वेळ येऊ नये म्हणून सुहेल मुकादम एकाच वेळी कफमचे 20-25 नग जिल्हा रुग्णालयाया दान करतो. आजही सुहेल मुकादमने जिल्हा रुग्णालयाला 20 नग दान केले. त्यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रल्हाद देवकर यांनी सुहेल मुकादम याच्या कानाचे कौतुक केले.
सुहेल मुकादम शिवसेनेचा तरुण नगरसेवक त्याच्या रुग्णसेवेने अधिक परिचित आहे. कारण नगरसेवक नसतानाही सुहेल मुकादम शासकीय रुग्णालयात रुग्णालयात रुग्णांच्या मदतीसाठी धावपळ करायचा. त्याच्या कामाच्या मदतीची दखल शिवसेनेने घेतली आणि 2016च्या नगरपरिषद निवडणूकीत नगरसेवकपदाची उमेदवारी देताच सुहेल रुग्णसेवकाचा नगरसेवक झाला.
































































