
शासनाने १५ मार्च २०२४ रोजी शिक्षकांच्या संचमान्यतेचा शासन निर्णय काढला होता.त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दोन हजार शिक्षक अतिरिक्त होऊन खेड्यापाड्यातील अनेक शाळा बंद पडणार आहेत.त्यामुळे गोरगरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत.त्यामुळे संचमान्यतेचा हा जाचक निर्णय रद्द करावा अशी मागणी रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीने उद्या दि.५ डिसेंबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात शाळा बंद आंदोलन पुकारले आहे.
संचमान्येतेमुळे पहिली ते पाचवी पर्यंतच्या अनेक शाळा शून्य शिक्षकी किंवा एक शिक्षकी होतील.शून्य शिक्षकी शाळा बंद होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.पाचवी ते आठवी शाळा द्विशिक्षकी होणार आहेत.अपुऱ्या शिक्षक संख्येमुळे त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होणार आहे.म्हणून प्राथमिक शिक्षकांनी संचमान्यतेला विरोध केला आहे.हि जाचक संचमान्यता रद्द करावी अशी मागणी करत उद्या शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.
मोर्चाला स्थगिती
संचमान्यतेला विरोध करत शिक्षक उद्या शुक्रवारी रत्नागिरी शहरात मोर्चा काढणार होते.मात्र प्रशासनाने मोर्चाला परवानगी नाकारली आहे.त्यामुळे मोर्चा स्थगित करण्यात आला आहे.उद्या फक्त शाळा बंद आंदोलन होणार आहे.




























































