
रत्नागिरी जिल्हापरिषदेच्या 56 गटांची आरक्षण सोडत सोमवारी काढण्यात आली. २८ जिल्हापरिषद गट महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. वाटद गट अनुसूचित जाती महिला, हातखंबा गट अनुसूचित जाती आणि हर्णे गट अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव झाला आहे. अपेक्षित आरक्षण पडल्याने काही इच्छुकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मात्र काहींच्या पदरी निराशा आली.शिंदे गटात गेलेल्या अनेकांचे आरक्षण सोडतीत पत्ते कट झाले आहेत. जिल्हाधिकारी मनुज जिंदाल आणि निवासी जिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत आज नियोजन समितीच्या सभागृहात सोडत काढण्यात आली.
जिल्हापरिषद गट सोडत –
सर्वसाधारण-भिंगळोली, बाणकोट, केळशी, जालगाव, कोळबांद्रे, दयाळ, उमरोली, कोकरे, असगोली, खालगांव, कोतवडे, गोळप,पावस,धामापूर तर्फे संगमेश्वर, कडवई, कौसुंब, दाभोळे, गवाणे, वडदहसोळ, धोपेश्वर,
नागरिकांचा मागास प्रवर्ग- सुकिवली, श्रृंगारतळी, पडवे, नाचणे, कर्ला, जुवाठी, भडगाव
सर्वसाधारण महिला- धामणदेवी,कळवंडे,पेढे,खेर्डी,सावर्डे,वहाळ,वेळणेश्वर,झाडगाव म्युन्सिपल हद्दीबाहेर, खेडशी, कसबा संगमेश्वर, मचुरी, साडवली,आसगे,भांबेड,साटवली,तळवंडे,साखरीनाटे आणि कातळी
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला-
पालगड,दाभोळ,भरणे,विराचीवाडी,लोटे,अल्लोरे, शिरगाव,कोंडकारूळ
अनुसूचित जाती महिला- वाटद
अनुसूचित जाती- हातखंबा
अनुसूचित जमाती महिला-हर्णे