
सामना ऑनलाईन । मुंबई
रात्रीस खेळ चाले पर्व दुसर्यामध्ये मालिका आता वेगळ्याच टप्प्यावर पोहोचली आहे. अनपेक्षितपणे शेवंता अण्णांच्या वाड्यावर पोहोचली आहे. तेव्हा नेमकं माईचे मंगळसूत्र वाढवलं आहे. त्यात पंचांग पाहून भविष्य पाहणार्या पाटणकरांनी माईंच्या सौभाग्यावर सावली आल्याचे भाकित केले आहे.
त्यानंतर रागावलेले अण्णा दारूच्या नशेत भल्या रात्री पाटणकरांच्या घरी पोहोचले आहे. जेव्हा जेव्हा माणसं जड झाली तेव्हा तेव्हा अण्णांनी त्यांचा काटा काढून त्यांच्या नावाचे आंब्याचे कलम लावले आहे. अण्णांचा वाडा शेवंताच्या मनात बसला आहे आणि त्यात तिला पाटणकरांच्या संसाराचा कंटाळा आला आहे. अण्णा आजच्या भागात पाटणकरसोबत काय करणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.



























































