रवींद्र वायकर यांच्या मागणीला यश, विकासकामांच्या नूतनीकरणात लोकप्रतिनिधींच्या नावाची कोनशिला कायम राहणार

विकासनिधी अंतर्गत तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे नूतनीकरण करताना मूळ उद्घाटनाच्या नावाची कोनशिला आता कायम राहणार आहे. जोगेश्वरीचे आमदार रवींद्र वायकर यांनी पालिकेकडे केलेल्या मागणीची दखल घेत पालिका प्रशासनाने याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

विकासकामे करणाऱ्य़ा लोकप्रतिनिधींचा 5 वर्षांचा कार्यकाल संपल्यानंतर नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींमार्फत तत्कालीन लोकप्रतिनिधींनी केलेल्या विकासकांच्या नूतनीकरणावर खर्च करण्यात येतो. यावेळी जुनी कोनशिला काढून नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या नावाची कोनशिला लावण्यात येते. मुळात अनेक अडचणींचा सामना करत आवश्यक त्या सर्व परवानग्या घेऊन लोकप्रतिनिधी त्यांच्या निधीचा सुनियोजित वापर करून विभागात विकासकामे करीत असतात. नव्याने निवडून आलेले लोकप्रतिनिधी अनेक वेळा या विकासकामांचा पुनर्विकास न करता केवळ नूतनीकरण करतात. त्यामुळे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर तत्कालीन लोकप्रतिनिधीमार्फत बांधण्यात आलेल्या विकासकामांच्या मूळ उद्घाटनाची कोनशिला नवनियुक्त लोकप्रतिनिधींनी काढणे अयोग्य असल्याचे मत रवींद्र वायकर यांनी मुंबई महापालिका आयुक्त यांना जानेवारी 2020 मध्ये पाठविलेल्या लेखी पत्रात नमूद केले होते.

 

आपली प्रतिक्रिया द्या