केंद्रीय कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद स्वतःहून झाले होम क्वॉरंटाईन; अमित शहा यांची घेतली होती भेट

केंद्रीय कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी स्वतःला होम क्वॉरंटाईन करून घेतले आहे. प्रसाद यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शनिवारी संध्याकाळी भेट घेतली होती. अमित शहा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजल्यानंतर सुरक्षेसाठी प्रसाद स्वतःहून होम क्वारंटाईन झाले आहेत. प्रसाद यांची प्रकृती चांगली असल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत प्रसाद यांच्या कार्यालयाकडून माहिती देण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे रविवारी जाहीर केले होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपण कोरोना पॉझिटिव्ह असून गेल्या काही दिवसात आपल्या संपर्कात आलेल्यांनी सुरक्षेसाठी विलगीकरणात राहावे आणि आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन केले होते. प्रसाद यांनी शनिवारी संध्याकाळी अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्यांनी स्वतःला होम क्वॉरंटाईन केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस येदियुरप्पा, उत्तर प्रदेश भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि उत्तर प्रदेश सरकारमधील एक मंत्री कोरोनाबाधित आढळले आहेत. तर उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री कमला रानी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या