कोरोनारुपी विश्वचषक एकजुटीने जिंकूया, रवी शास्त्री यांचा निर्धार

733

सध्या आपण सर्वजण कोरोनाच्या तडाख्यात सापडलो आहोत. हा प्राणघातक विषाणु साऱ्या विश्वचषक स्पर्धेचा बाप आहे. त्यामुळे ही कोरोना व्हायरसरूपी विश्वचषकाची लढाई आपण एकजुटीने जिंकूया, असा निर्धार टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केला.

करोना व्हायरसच्या वाढत्या फैलावामुळे सध्या अवघे विश्व ठप्प झाले आहे. हजारों नागरिकांचा या महामारीने बळी घेतला असून, लाखोंना याची लागण झाली आहे. क्रीडाविश्वालाही या कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे कोरोनाविरुद्धचा वर्ल्डकप आपण सर्वजण एकजुटीने जिंकूया असे आवाहन रवी शास्त्री यांनी केले आहे. ते म्हणाले, ’खेळ फक्त जय-पराजय एवढयापुरता मर्यादित असत नाही. खेळ तुम्हाला जीवनातील असे काही धडे देतो, ज्याचा तुम्हाला कुठेही वापर करता येतो. सध्या आपण सारे करोनाशी निकाराची झुंज देत आहोत. करोनाशी संघर्ष करणे म्हणजे विश्वचषकासाठी स्पर्धा करण्यासारखेच आहे. करोना हा साया विश्वचषकांचा बाप आहे. हा विश्वचषक जिंकण्यासाठी आपण आपलं सर्वस्व पणाला लावायला हवं. या विश्वचषकासाठी आपण फक्त 11 नव्हे, तर 1.4 बिलियन लोक एकजुटीने प्रयत्न करूया आणि करोनाला पळवून लावूया, असा संदेश त्यांनी एका व्हिडीओ क्लिपच्या माध्यमातून दिला आहे.

याचबरोबर, कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी तुम्ही सर्वजण सध्या घरातचं थांबा आणि सुरक्षित राहा, असा सल्लाही रवी शास्त्री यांनी देशवाशियांना दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या