
वेस्ट इंडीज विरोधात टी 20, वनडे आणि टेस्ट सीरीज जिंकल्यानंतर टीम इंडिया मायदेशी परतण्याच्या तयारीत आहे. याचदरम्यान टेस्ट सीरीजची दुसरी मॅच एक दिवसाआधीच संपल्याने टीम इंडीया जमैका फिरायला गेली होती. त्यावेळचा कोच रवि शास्त्री यांनी मद्याचा प्याला हातात घेतलेला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. या फोटोवरून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले असून ‘हे तर बेवडे आहेत‘ असे म्हटले आहे.
Sunny Jamaica. The punch in my left hand tastes divine pic.twitter.com/bGUTlp4NxZ
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) September 4, 2019
नेटकऱ्यांनी रवि शास्त्री यांना ट्रोल करण्याची ही काही पहीली वेळ नाही. तर याआधीही नेटकऱ्यांनी त्यांची टर उडवली आहे. गेल्यावेळी शास्त्री यांनी त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यावेळी नेटकऱ्यांनी तो फोटो एडिट करत त्यांच्या हातात मद्याची बाटली व ग्लास असल्याचे दाखवले होते. दरम्यान, शास्त्री यांनी पोस्ट केलेल्या फोटोखाली एटींगातील उष्मा बघून आपल्याला ज्यूसची गरज असल्याचे म्हटले. पण त्यांच्या हातात एक भरलेला ग्लास दिसत आहे. त्यावरच नेटकऱ्यांनी त्यांना लक्ष्य केलले. काहींनी तर कोचने मद्यासारख्या व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला शास्त्री यांनी दिला. तर काही जणांनी ते बेवडेच असल्याचे म्हटले आहे. तर अनेकांनी त्यांना कोच या पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.

























































