
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर टीम इंडियाला दक्षिण आफ्रिककडून दारूण पराभव स्वीकारावा लागला. सुपर-8 मधील पहिल्याच लढतीत हिंदुस्थानचा संघ 76 धावांनी पराभूत झाला. त्यामुळे सेमीफायनल गाठण्यासाठी आता हिंदुस्थानला पुढील दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकणे गरजेचे आहे. या लढतीमध्ये हिंदुस्थानने उपकर्णधार अक्षर पटेल याला संघात स्थान दिले नाही, त्याच्या ऐवजी अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर याला खेळवण्यात आले. मात्र सुंदर फलंदाजी आणि गोलंदाजीतही आपली छाप सोडू शकला नाही. हा मुद्दा उपस्थित करत हिंदुस्थानचा दिग्गज फिरकीपटू आर. अश्विन याने टीम मॅनेजमेंटवर आसूड ओढला.
आर. अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनेलवर हिंदुस्थानच्या पराभवाबाबत भाष्य केले. गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादव यांनी अक्षर पटेल ऐवजी वॉशिंग्टन सुंदरला संघात स्थान दिले, या निर्णयावर अश्विनने कडक शब्दांत टीका केली आहे. पटेलची अनुपस्थिती ही टीम इंडियाची मोठी घोडचूक असल्याचे त्याने म्हटले आहे.
जेव्हा आयपीएलसारखा मोठा सीझन असतो, तेव्हा खेळाडूंना रोटेट करणे मला मान्य आहे, पण आयसीसी वर्ल्ड कपमध्ये संघात स्थिरता असणे सर्वात महत्त्वाचे असते, असे आर. अश्विन म्हणाला.
ICC T20 WC – सूर्यकुमार बाद होताच हार पत्करली, संघाआधी क्रिकेटप्रेमींनीच मैदान सोडले
हो, तुम्ही वॉशिंग्टन सुंदरला डाव्या हाताच्या फलंदाजांना रोखण्यासाठी संघात घेतले असेल, पण तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की अक्षर पटेल हिंदुस्थाच्या टी-20 क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाचा खेळाडू राहिला आहे. त्याने आतापर्यंत काय कामगिरी केली आहे, हे आपण विसरता कामा नये. गेल्या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हिंदुस्थान अशाच परिस्थितीत अडकला होता आणि तेव्हा अक्षर पटेलनेच संघाची धुरा सांभाळली होती, अशी आठवणही अश्विनने करून दिली.
दरम्यान, टी-20 वर्ल्डकपमध्ये आतापर्यंतच्या कामगिरीवर नजर टाकली, तर वॉशिंग्टन सुंदरने 2 सामने खेळले आहेत, तर अक्षर पटेल 3 सामन्यांत हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले आहे. तुलना केल्यास पटेलची कामगिरी सुंदरच्या तुलनेत कैक पटीने चांगली राहिली आहे. सुंदरला आपल्या दोन सामन्यांत एकही विकेट मिळवता आली नाही, तर पटेलने 3 सामन्यांत 6 विकेट्स घेतल्या आहेत.
🚨 Ravichandran Ashwin Raises Question on Dropping Axar Patel 🚨
“In long IPL seasons, match-ups and rotation make sense. But in ICC World Cups, stability matters more.
Yes Sundar can be used for specific roles. But Axar Patel has been India’s T20 MVP. Let’s not forget what… pic.twitter.com/4suMfFQznc
— Rohan💫 (@rohann__45) February 22, 2026

























































