हॉलतिकीटचा फोटोसहीत डाटा परीक्षा केंद्रावर पाठवा, लॉ सीईटी सेलला रवींद्र वायकर यांच्या सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

लॉच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेताना सीईटी सेलने त्यांच्याकडील विद्यार्थ्यांचा फोटोसहीत डाटा संबंधित परीक्षा केंद्राकर पाठकाका, असे निर्देश उच्च क तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र कायकर यांनी सीईटी सेलच्या अधिकाऱ्यांना दिले.

नुकताच तृतीय आणि पाच वर्षे लॉ अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला; परंतु प्रवेश प्रक्रिया राबवण्याऐकजी सीईटी सेलने विद्यार्थ्यांना या परीक्षेचे हॉलतिकीट पुन्हा सबमिट करण्यास सांगितले. परीक्षेनंतर ज्या विद्यार्थ्यांकडे हॉलतिकीट नाही अथवा हरवले आहे अशा विद्यार्थ्यांना पोलिसांकडून एनसी आणून डुप्लिकेट हॉलतिकिटासाठी 100 रुपये दंड भरण्यासही सांगण्यात आले आहे. याविषयी शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर यांनी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाऊ नये तसेच हॉलतिकीट अपलोड करण्याची जबरदस्तीही विद्यार्थ्यांवर करू नये, अशी मागणी करण्यात आली.

लॉ सीईटी ही एका एजन्सीमार्फत घेतली जाते अशी माहिती सीईटी सेलचे परीक्षा समन्वयक जयंत पाटील यांनी दिली. यापुढे सीईटी घेताना सीईटी सेलकडे असलेल्या हॉलतिकीटचा विद्यार्थ्यांच्या फोटोसहीतचा डाटा संबंधित परीक्षा केंद्रावर पाठवण्यात यावा. यामुळे कुठल्याही परीक्षार्थी विद्यार्थ्याच्या जागेकर डमी विद्यार्थ्याने परीक्षा देण्याचा प्रयत्न केला तर अशा विद्यार्थ्यांना ओळखणे शक्य होईल. या उपरोक्तही कुणी डमी विद्यार्थी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, असे निर्देश राज्यमंत्री वायकर यांनी सीईटी सेलच्या अधिकाऱयांना दिले.