महायुतीचे उमेदवार रवीशेठ पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पेण-पाली विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रवीशेठ पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी, माजी आमदार अनिल तटकरे, संदीप तटकरे, बाळाजी म्हात्रे, ललित पाटील, वैकुंठ पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख अविनाश म्हात्रे, नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांच्यासह शिवसेना भाजप आरपीआय महायुतीचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी माधव भंडारी म्हणाले की, रवीशेठ पाटील यांना मत म्हणजे नरेंद्र मोदी यांना मत, या निवडणुकीत महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सुशासन आणण्यासाठी सज्ज व्हा. विरोधकांचे डिपॉझिट जप्त करा व रवीशेठ पाटील यांना बहुमताने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले. माजी आमदार अनिल तटकरे यांनी रवीशेठ पाटील यांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली. तसेच कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत रविशेठ पाटील यांना लाखोंच्या मताधिक्याने निवडणूक आणा असे आवाहन केले. तर युतीचे उमेदवार रवीशेठ पाटील यांनी बोलतांना सांगितले की शेकापच्या धैर्यशील पाटिलांचा डिपॉझिट जप्त होणार असेच चित्र दिसत आहे. कारण संपूर्ण मतदार संघातील हजारो कार्यकर्ते आज उपस्थित आहेत. नियोजन बद्ध प्रचार करा आपला विजय निश्चित आहे. शेकापच्या आमदारानी दहा वर्षात कामे केलीच नाही .त्यामुळे या पदावर राहण्याचा त्यांना अधिकार नाही. आपण मंत्री असतांना एक वर्षात 400 कोटींची कामे केले. 35 वर्ष एकाच घरात आमदारकी आहे तरी पेण मतदार संघाचा विकास झाला नाही? रिलायन्स गॅस लाईन मध्ये काय झाले हे जनतेला माहिती आहे.पेण पूर्व विभागात देखील भाजप सेनेला चांगला पाठिंबा आहे. त्यामुळे आता आपण किमान 60 हजारांच्या फरकाने आपण निवडूण येणार आहोत केंद्रात व राज्यात पुढील वीस वर्षे भाजप ची सत्ता राहणार असल्याने त्या मााध्यमातून या मतदार संघाचा अधिक विकास करण्याची ग्वाही त्यांनी दिली.