रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये असिस्टंट पदासाठी भरती, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे प्रशिक्षण वर्ग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये असिस्टंट या पदाकरिता नोकरभरती होणार आहे. या नोकरभरतीत स्थानिक भूमिपुत्रांची भरती झालीच पाहिजे, या न्याय्य मागणीसाठी शिवसेनाप्रणित स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे नोकरभरतीपूर्व परीक्षेचे ऑनलाइन, ऑफलाइन प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहेत.

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई, महासंघ कार्याध्यक्ष विलास पोतनीस, आमदार सुनील शिंदे, महासंघ सरचिटणीस प्रदीप मयेकर यांच्या सूचनेनुसार प्रशिक्षण वर्ग महासंघातर्फे घेण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ कार्यालय, शिवसेना भवन, पहिला मजला येथे रविवार व सुट्टीचे दिवस वगळून सायंकाळी 6.30 ते 8.30 या वेळेत चिटणीस शरद एक्के (9892699215) श्रीराम विश्वासराव (9869588469), विलास जाधव (9619118999), सुधाकर नर (8369442951), संभाजी भोगले (9022415876), आनंद पाटकर (8779851113) यांच्याशी संपर्क साधावा असे महासंघाचे चिटणीस व प्रशिक्षण वर्ग प्रमुख उमेश नाईक यांनी कळवले आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये असिस्टंट या पदाकरिता होणाऱया नोकरभरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी www.rbi.org.in या संकेतस्थळावर 8 मार्च 2026 पर्यंत अर्ज करावयाचा आहे. उमेदवार पदवीधर असावा व त्याला कमीत कमी 50 टक्के गुण असावेत. उमेदवाराचे वय सर्वसाधारण वर्गाकरिता शासकीय नियमानुसार असेल तसेच आरक्षित प्रवर्गाकरिता कमाल वयोमर्यादेत शासकीय नियमानुसार सवलत, शिथिलता असेल. सदर नोकरभरतीसाठी जास्तीत जास्त भूमिपुत्रांनी अर्ज करावेत असे आवाहन महासंघातर्फे करण्यात येत आहे.

RBI announces recruitment for Assistant posts. Sthanika Lokadhikar Samiti offers training classes for local candidates at Shiv Sena Bhavan.