हिंदुस्थान स्वतःची क्रिप्टोकरन्सी आणणार….आरबीआय पुढील वर्षी डिजिटल करन्सीच्या विचारात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रिप्टोकरन्सीबाबत ठेस निर्णय घेण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. त्यासाठी बैठकाही झाल्या आहेत. भारतीय रिजर्व बँक (आरबीआय) आणि अनेक तज्ज्ञांनी याबाबत आपली मते केंद्र सरकारकडे व्यक्त केली आहेत. त्यातच आता महत्त्वाची माहिती मिळाली आहे. आरबीआय पुढील वर्षी आपली डिजिटल करन्सी आणणार आहे.त्यामुळे आता हिंदुस्थानची स्वतःची क्रिप्टोकरन्सी येणार आहे.

स्वतःची क्रिप्टोकरन्सी लॉन्च करण्यासाठी आरबीआयने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यावर आरबीआय विचार करत असून त्यासाठी प्लॅनही तयार करण्यात आला आहे. रॉयटरने स्थानिक वृत्तसंस्थेच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त दिले आहे. भारतीय स्टेट बँकेच्या (एसबीआय़) बँकिंग अॅण्ड एकोनॉमिक कॉन्क्लेवमध्ये आरबीआयच्या एका अधिकाऱ्याने हिंदुस्थानची स्वतःची क्रिप्टोकरन्सी लवकरच येण्याची शक्यता वर्तवली आहे.

पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत प्रायोगित तत्वावर डिजिटल करन्सी लॉन्च करण्यात येईल, अशी माहिती आरबीआयचे पुरवठा विभागाचे मुख्य महाप्रबंधक पी. वासुदेवन यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या पोजेक्टबाबत आम्ही सकारात्मक असल्याचे ते म्हणाले. पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (सीबीडीसीएस) लॉन्च करण्याची शक्यता आहे. ही डिजिटल करन्सी व्हर्चुअल असेल. मात्र, देशाचे मूळ चलन हे
रुपयाच असेल. म्हणजे डिजिटल स्वरुपात हा रुपया असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत सीबीडीसीएसद्वारे सॉफ्ट लॉन्चची शक्यता वर्तवली होती. मात्र, याबाबत त्यांनी विश्चित कालमर्यादा दिलेली नाही.

सीबीडीसीएस लॉन्च करणे सुलभ आणि सोपे नाही. ते लॉन्च केल्यावर ते सर्वसामान्यांच्या जीवनातील भाग बनणार आहे. ते एकप्रकारचे चलन असल्याचे त्याचे सर्वसामान्यांवरही परिणाम होणार आहे. त्यामुळे त्यावर योग्य तो विचारविनिमय करूनच ते लॉन्च करण्यात येणार आहे. ते लॉ्नच करण्यापूर्वी अनेक बाबींचा विचार करावा लागणार आहे. हे कशाप्रकारे लॉन्च करावे, याला कशाप्रकारे मान्यता द्यावी, त्याचे विचरण कशापद्धतीने असावे, ही फक्त बाजारात असेल की दैनंदिन व्यवहारातही त्याचा वापर करता येईल, अशा अनेक पैलूंवर विचार करण्यात येत आहे. यावर योग्य ती भूमिका ठरल्यावरच ते लॉन्च करण्यात येईल. त्यामुळे याच्या लॉन्चबाबत घाईगडबडीत कोणताही निर्णय घेण्यात येणार नसल्याचे वासुदेवन यांनी सांगितले.