जिरे आणि ओवा यांना स्वयंपाकघरातील डाॅक्टर का म्हणतात, वाचा

सध्याच्या घडीला फिटनेस हा फक्त शो आॅफ राहिलेला नाही. तर फिटनेस हा गरजेचा झालेला आहे. फिटनेस मध्ये केवळ व्यायाम महत्त्वाचा नाही. तर फिटनेसमध्ये योग्य आहारही तितकाच महत्त्वाचा मानला जातो. फिटनेससाठी विविध महागडी उत्पादने गरजेची नसून केवळ आपल्या स्वयंपाकघरातील काही पदार्थ गरजेचे आहेत. मलायका ही सकाळी उठताच रात्रभर भिजवलेले जिरे आणि ओवा यांचे कोमट पाणी पिते. सध्याच्या घडीला तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

बदलत्या वातावरणाला सामोरे जाताना आहारात हे पदार्थ समाविष्ट करायलाच हवेत

जिरे आणि ओवा पाण्याचे फायदे

जिरे आणि ओवा यांना “स्वयंपाकघरातील डॉक्टर” म्हटले जाते कारण ते पचनासाठी खूप फायदेशीर असतात. जिऱ्यातील थायमॉल एंजाइम पोटातील आम्ल तयार करून अन्न पचवण्यास मदत करतात. तर ओव्यामुळे गॅस आणि पोटफुगी कमी होते. म्हणूनच सकाळी उठल्यानंतर ओवा आणि जिरे यांचे कोमट पाणी पिणे फार गरजेचे आहे.

जेवणानंतर चिमूटभर हा पदार्थ पचनासाठी सर्वात उत्तम, वाचा

डाएट्सच्या तुलनेत जिरे पाणी हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले उपाय आहे. दररोज ते पिल्याने शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. तसेच ओव्यामुळे पाण्याचे प्रमाण कमी होते. ओवा आणि जिरे पाणी एकत्र प्यायल्याने, वजन कमी होण्यास जलद मदत होते.

रात्रभर भिजवलेल्या जिरे आणि ओव्यात अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात. यामध्ये थोडी बडीशेप घातल्याने पचन आणि आम्लता दोन्ही सुधारते. हे पेय यकृत स्वच्छ करण्यास देखील गरजेचे मानले जाते.

मूग डाळ सर्व वयोगटासाठी का आरोग्यवर्धक आहे? वाचा