
दात घासण्यासाठी आत तुम्हाला अधिक कष्ट घेण्याची गरज पडणार नाही. कारण Realme कंपनीने हिंदुस्थानच्या बाजारात M1 Sonic इलेक्ट्रिक टूथब्रश लॉन्च केला आहे. या इलेक्ट्रिक टूथब्रशचे वैशिष्ट्य म्हणजे एका मिनिटाला हा ब्रश 34 हजार वेळा व्हायब्रेट होतो.
कंपनीने याची किंमत 1,999 रुपये एवढी ठेवली आहे. हा टूथब्रश प्रभावीपणे कार्य करतो आणि तोंडातील सर्व भागात साफ करतो, असा दावा कंपनीने केला आहे. यासाठी टूथब्रशमध्ये चार क्लिनिंग मोड देण्यात आले आहेत.

कंपनीने टूथब्रशला 3.5 एमएमचा थिन मेटल फ्री ब्रश दिला आहे. हा ब्रश 99.99 टक्के बॅक्टेरिया क्लिन करतो असा दावा कंपनीने केला आहे. हेड बदलताना युजर्सला अलर्ट करण्यासाठी ब्रशला ब्लु इंडिकेटर देण्यात आले आहे.

ब्रशला 800mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली असून हा ब्रश फक्त 5 मिनिटांच्या चार्जिंगनंतर दोन दिवस वापरता येईल आणि फुल्ल चार्जिंग नंतर 90 दिवस वापरता येईल असा दावा कंपनीने केला आहे.

दरम्यान, हा टूथब्रश कंपनीच्या वेबसाईट आणि फ्लिपकार्टवर जाऊन तुम्ही खरेदी करू शकता. 10 सप्टेंबर पासून याची विक्री सुरू होणार आहे.























































