Realme Pad टॅब लॉन्च, जाणून घ्या फीचर आणि किंमत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

Realme नुकतंच आपला Realme Pad हा टॅब्लेट व्हर्च्युल इव्हेंटमधून लॉन्च केला आहे. ऑफिसचे काम करणार्‍यांसाठी हा टॅब जास्त उपयोगी आहे. कारण व्हिडीओ कॉन्फरन्ससंदर्भात कंपनीने त्यात खास फीचर्सचा समावेश केला आहे. टॅबमध्ये octa-core MediaTek Helio G80 SoC देण्यात आला असून डॉल्बी साऊंड देण्यात आला आहे.

Realme Pad खास फीचर

Realme Pad टॅबमध्ये ग्राहकांना RAM आणि इंटर्नल मेमरीमध्ये पर्याय देण्यात आला आहे. 3 GB  RAM +32 GB इंटर्नल मेमरी आणि 4 GBचा RAM+64 GB इंटर्नल मेमरी असे दोन पर्याय ग्राहकांसमोर आहेत.

टॅबमध्ये वायफाय आणि 4G देण्यात आला आहे. फोनमध्ये ओ”टीजीचे फीचर देण्यात आला आहे, जेणेकरून युजरला एक्स्टर्नल मेमरी कार्ड किंवा हार्ड डिस्क जोडता येणार आहे. टॅबमध्ये सनलाईट मोड फीचरचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार सुर्यप्रकाशात टॅब वापरता येणार आहे.

ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सम्ध्ये ऑडियो बंद करण्यासाठी नॉईस कॅन्सलेशनचे फीचर देण्यात आले आहे. फोनमध्ये डॉल्बी डिजिटल साऊंड असल्याने आवाजाचा दर्जा उत्तम असणार आहे.

टॅबची किंमत

टॅबची किंमत 13 हजार 999 रुपयांपासून सुरूवात होत आहे. त्यात फक्त वाय फाय असून 3 GB RAM आणि 32 GB इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे. तसेच 3 GB RAM आणि 32 GB इंटर्नल मेमरी वायफाय आणि 4 जी असलेल्या टॅबची किंमत 15 हजार 999 इतकी आहे. तर 4 GB RAM 64 GB इंटर्नल मेमरी वायफाय आणि 4 जी असलेल्या टॅबची किंमत 17 हजार 999 इतकी आहे.