म्हणून 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो

1867

26 जानेवारी हा हिंदुस्थानचा प्रजासत्ताक दिन. 15 ऑगस्ट 1947 रोजी हिंदुस्थानला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. परंतु संविधान लागू झाल्यानंतर देश प्रजासत्ताक झाला. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान बनवून पूर्ण झाले तरी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक का साजर केला जातो? याचे उत्तर खास सामनाच्या वाचकांसाठी

26 नोव्हेंबर 1949 रोजी हिंदुस्थानची राज्यघटना पूर्ण झाली. तरी त्याच्या दोन महिन्यांनंतर ही राज्यघटना लागू करण्यात आली. याच दिवसाला प्रजासत्ताक दिन म्हटला जातो. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचे प्रमुख कारण आहे. 26 जानेवारी 1930 रोजी काँग्रेसने देशातील हजारो लोकांना ब्रिटिशांकडून पूर्ण स्वराज्य मिळवण्याची शपथ घेतली होती. त्यानंतर दरवर्षी आंदोलनाचा भाग म्हणून 26 जानेवारीचा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून पाळला जात असे. पुढे राज्यघटना लागू करण्यासाठी या दिवसाची निवड करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या