का हरली भाजपा?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
modi-fail-lok sabha

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पाच राज्यांमध्ये भाजपला फटका का बसला याबद्दल राजकीय विश्लेषकांनी कारणमीमांसा केली आहे. नोटाबंदी, जीएसटी, वाढती बेरोजगारी, शेतकरी कर्जमाफी आणि अॅट्रॉसिटीच्या घटनांमध्ये झालेली वाढ या प्रमुख कारणांसह अनेक मुद्दे भाजपसाठी घातक ठरले.

– नोटाबंदीमुळे राजस्थानात असलेला प्रचंड संताप
– वाढती बेरोजगारी, जीएसटी आणि अॅट्रॉसिटीच्या घटनांमध्ये वाढ
– शेतकरीविरोधी धोरणांमुळे मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील शेतकऱयांमध्ये नाराजी
– राजधानीमध्ये शेतकऱयांच्या मोर्चावर झालेला लाठीमार
– प्रशासनातील भ्रष्टाचार
– पिकांच्या आधारभूत किमतीत झालेली घसरण
– नक्षलप्रभावित भागांमध्ये भाजपविरोधात लाट
– विद्यमान आमदारांना तिकिटे दिल्याने पक्षांतर्गत नाराजी
– सत्तेवर आल्यास दहा दिवसांत शेतकरी कर्जमाफीचे काँग्रेसने दिलेले आश्वासन
– नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेला लागलेली ओहोटी
– राजस्थानात रस्ते विस्तारासाठी मंदिरांवर बुलडोझर्स फिरवल्याने हिंदूंमध्ये नाराजी
– भाजीपाला आणि स्वयंपाकाचा गॅस महाग झाल्याने महिलांमध्ये भाजपबद्दल नापसंती