
इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना एखाद्या कारणावरून नोटीस पाठवली जाते. तुम्हाला जर अशी नोटीस मिळाली तर घाबरून जाऊ नका. शांत राहा. नोटीस काळजीपूर्वक वाचा.
नोटीस कोणत्या विषयावर आहे. थकबाकी, नियमभंग की वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस आहे, हे पाहा. काय मुद्दे मांडले तेही तपासा. अंतिम मुदत कधीपर्यंत आहे, हे पाहा.
नोटीस मिळाल्यानंतर सोसायटीच्या संबंधित पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधा. त्यांचे काय म्हणणे आहे, हे सविस्तर जाणून घ्या. त्यावर सविस्तर माहिती द्या.
जर नोटीस गंभीर स्वरूपाची असेल तर तसेच तुम्हाला कायदेशीर कारवाईची भीती वाटत असेल तर वकिलाचा कायदेशीर सल्ला घ्या. वकील तुम्हाला कायदेशीर मार्गदर्शन करेल.
कोणतीही नोटीस असेल तर तिला मुदत संपण्यापूर्वी सोसायटीला लेखी किंवा आवश्यक भासल्यास वकिलामार्फत प्रतिसाद द्या. नोटिसीकडे दुर्लक्ष करू नका.