
सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या इच्छुकांसाठी आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजे कमी शैक्षणिक पात्रता असलेल्या तरुणांना सरकारी नोकरी मिळवण्याची एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO)ने नवीन भरती अधिसूचना जारी केली आहे. या भरती अंतर्गत एकूण 153 पदांवर नियुक्ती केली जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवार EPFOच्या अधिकृत वेबसाइट epfindia.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
या भरतीअंतर्गत एकूण 153 पदे भरली जातील. यामध्ये लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) आणि ज्युनिअर सेक्रेटरियल असिस्टंट (JSA) या पदांचा समावेश आहे. ही भरती तरुणांसाठी एक चांगली संधी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण केलेली असावी. याव्यतिरिक्त, उमेदवारांना संगणकाचे मूलभूत ज्ञान असावे.



























































