
मुंबईतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 211 जागांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे. ही भरती मुंबईतील सेंट जॉर्जेस रुग्णालय, नागी स्वास्थ केंद्र वांद्रे, परिचर्या शिक्षण संस्था मुंबई, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, आयुष संचालनालय महाराष्ट्र, म. आ. पोदार रुग्णालय, रा. आ. पोदार वैद्यक महाविद्यालय (आयु) मुंबई या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवार 26 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतो. सविस्तर माहिती cdn.digialm.com वर देण्यात आली आहे.